– यंदा ‘हे’ आहेत नवीन आकर्षण
The गडविश्व
गडचिरोली, दि.२६ : जिल्हा मुख्यालयी चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन वासेकर ग्राउंड मध्ये माऊली एकता मीनाबाजार प्रस्तुत खास दिवाळी निमित्त उत्सव मेला १० नोव्हेंबर पासून सुरू झाला असून नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दररोज सायंकाळी ५ ते रात्रो १० वाजता पर्यंत सदर मीनाबाजार सुरू राहत असून यंदा आकाशझुला, ब्रेकडान्स, कोलंबस, यासह मौत का कुवा हे विशेष आकर्षण आहे. यासह बालकांना डिस्को डान्स चे साधन, लहान चारचाकी वाहन उपलब्ध आहेत. त्यामुळे लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन या मीनाबाजारातून होत आहे. तसेच विविध दुकाने सुद्धा आहेत त्यामुळे विशेष खरेदी सुद्धा करता येत आहे. नागरिकांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन मीनाबाजार व्यवस्थापक यांनी केले आहे.