गडचिरोली : रानटी हत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई मंजूर

13

The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या सूर्य डोंगरी शिवारात रानटी हत्तींनी केलेल्या मक्याच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
१८ मार्च २०२५ रोजी रानटी हत्तींच्या कळपाने देविदास बालाजी मेश्राम यांच्या शेतातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. हत्तींच्या या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी, कृषी सहायक आणि तलाठी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्यानंतर अहवाल वडसा वन विभागाकडे सादर करण्यात आला.
वडसा वन विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाने या अहवालाच्या आधारे २६ मार्च २०२५ रोजी नुकसान भरपाई मंजूर केली आहे. संबंधित भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येईल. प्रशासनाने केलेल्या या तत्पर कारवाईबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वडसा वन विभागाकडून शेतपिकांच्या नुकसानीसाठी शासन निर्णयांनुसार भरपाई तत्काळ अदा केली जात असल्याची माहिती उपवनसंरक्षक वरुण बी. आर. यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here