– बकरीला वाचवितांना झाली झटापट
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १९ फेब्रुवारी : बकऱ्या चारत असतांना बिबट्याने केलेल्या हल्ल्या दरम्यान बकरीला वाचविण्यासाठी गुराखी बिबट्याशी भिडला या झटापटीत गुराखी गंभीर जखमी झाल्याची घटना आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. खुशाल उरकुडा कोहळे (५८) रा.देऊळगाव असे जखमी झालेल्या गुरख्याचे नाव आहे.
खुशाल कोहळे हे मजुरीचे काम करत असून रिकाम्या वेळेत ते गुरेही चारतात. शनिवारी ते दुपारच्या सुमारास बकऱ्या चारण्याकरिता देऊळगाव येथील टेकडीवर बकऱ्या चारण्याकरिता गेले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील एका बकरीवर हल्ला केला. दरम्यान खुशाल कोहळे यांनी बकरीला वाचविण्यासाठी बिबट्यावर धावून गेले. या झटापटीत त्यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी आवाज एकूण आसपासच्या नागरिकांनी कळपाच्या दिशेने धाव घेतली असता बिबट्याने जंगलात धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व खुशाल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सदर घटनेने टेकडीवर वाघाचा वावर असल्याचे दिसून येत असून टेकडीवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सदर घटनेने मात्र परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Armori) (Deulgao)