गडचिरोली : देवेंद्र लांजेवार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

668

– मुंबई येथे पुरस्कार वितरण
The गडविश्व
गडचिरोली, २४ फेब्रुवारी : जिल्ह्यातील पंचायत समिती धानोरा अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगांव येथील शिक्षक देवेंद्र जगन्नाथ लांजेवार यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सन २०२१-२२ साठी प्राथमिक शिक्षक प्रवर्गातून निवड करण्यात आली होती. आज शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील रंगशारदा सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याचे पर्यटन, महिला व बाल कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषद आमदार कपिल पाटील, सुरज मांढरे, कौस्थुभ दिवेगावकर व मान्यवरांच्या हस्ते देवेंद्र लांजेवार यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देवेंद्र लांजेवार हे उपक्रमशील शिक्षक असून शाळेत आजपर्यंत विविध उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता वाढविण्याकरिता सतत प्रयत्नरत आहेत. त्याचे कोरोना काळातील ‘चालता बोलता शिक्षण’ या उपक्रमाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर सोबतच ‘शाळेत बालकांची शिक्षण परिषद’, ‘कृतीयुक्त अध्यापन’ शब्दसंग्रतून अध्ययन, व्यसनमुक्ती उपक्रम, माझा वार माझा उपक्रम, असे उपक्रम विशेष असून नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी विद्यार्थी पात्र होत आहेत. तालुक्यातील सतत निकाल देणारी ही एकमेव शाळा आहे. शाळेची दरवर्षी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येत असून त्या द्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. शिक्षक लांजेवार यांनी शाळा डिजिटल केलेली असून शाळेत डिजिटल पद्धतीने अध्यापन केले जाते. कोरोना काळात शिक्षक आपल्या दारी उपक्रम राबविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद गडचिरोली ने जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात शाळेने क्रीडा स्पर्धेत दरवर्षी यश संपादन केलेले असून तालुक्यात सदैव अग्रणी असलेली शाळा म्हणून नाव लौकिक आहे.
देवेन्द्र लांजेवार यांचे शैक्षणिक कार्य इतर शिक्षकांकरिता प्रेरणादायी आहे. त्यांच्या या शैक्षणिक कार्यांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवांवित केले आहे. शिक्षक देवेंद्र लांजेवार यांनी आपल्या यशाचे श्रेय आपला परिवार, वरिष्ठ अधिकारी, मित्रमंडळी व शालेय विद्यार्थ्यांना दिले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (TheGdv) (Devendra Lanjewar) (Nimgao z p School) (Dhanora) (Digital school) (Mumbai) (State level ideal teacher award)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here