गडचिरोली : पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी दुसऱ्यांदा केला अतिसंवेदनशील भागाचा दौरा

314

– पोस्टे मन्नेराजाराम व पोस्टे भामरागड येथे दिली भेट
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी आज २९ फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस दलास भेट दिली. आगामी काळात येणा­ऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४ गडचिरोली जिल्ह्रातील अतिसंवेदनशील ठिकाणी सुरळीत पार पडाव्यात यासाठी त्यांनी अतिसंवेदनशिल पोस्टे मन्नेराजाराम येथे भेट दिली. भेटी दरम्यान लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टे मन्नेराजाराम येथील जवानांची स्टॅण्ड टू ड्रिल घेतली व पोस्टेच्या कामकाजाची पाहणी करुन उपस्थित अधिकारी व अंमलदार तसेच लहान मुले व नागरीकांसोबत संवाद साधला आणि पोस्टेतील जवानांसोबत नाश्ता करुन जवानांचे मनोबल वाढविले.
त्यानंतर गडचिरोली जिल्हयातील शेतकरी व इतर जनतेनी आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे. यासाठी पोस्टे भामरागड येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात पोलीस महासंचालक शुक्ला यांचे हस्ते व आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, म.रा.मुंबई शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी मेळाव्यात हजर नागरिकांना आंबा-40, चिक्कु-40 सिताफळ-40, फणस-40, लिंबू-40 इ. फळझाडांच्या रोपाचे तसेच शेतक­यांना कृषी उपयोगी अवजारे (सब्बल, कृषी स्प्रेपंप, घमेले) इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना पोलीस महासंचालक यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील शेतकरी व इतर जनतेनी आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करावी आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे. तसेच माओवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाला सहकार्य करुन गडचिरोली जिल्ह्राचा विकास साधावा. यासोबतच गावातील महिलांनी कृषी सहलीच्या माध्यमातून ज्ञान संपादन करुन विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीच्या कामामध्ये पुरुषांना हातभार लाऊन आपला व आपल्या परिवाराचा आर्थीक विकास साधावा.
त्यानंतर गडचिरोली जिल्ह्रातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणा­या शेतक­ऱ्यांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थितीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करतील व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपरिक शेती पध्दतीत बदल करतील व जिल्ह्रातील महिला शेतक­यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने, उपविभाग एटापल्ली, हेडरी व भामरागड येथील एकुण 45 महिलांसाठी गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून एकुण बाराव्या कृषी दर्शन सहलीचे व सन 2024 मधील पहिल्या सहलीचे आयोजन करण्यात आले. सदर कृषी दर्शन सहल ही १ ते ८ मार्च पर्यंत एकुण 08 दिवस आयोजीत करण्यात आली असून, या बाराव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यक्रमास पोलीस महासंचालक यांनी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवुन शुभेच्छा दिल्या.
दिवसभर चाललेल्या या सर्व कायक्रमांमध्ये आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, म.रा. मुंबई शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल पोलीस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव पोलीस बल 191 बटा. चे कमांण्डंट एम. एस. खोब्राागडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here