गडचिरोली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामार्फत ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न

188

The गडविश्व
गडचिरोली, ७ फेब्रुवारी : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली व बार्टी,पुणे अंतर्गत स्पर्धा परीक्षा (आय.बी.पी.एस. व पोलीस) भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र,गडचिरोली भारतीय सामाजिक बहुउदेय विकास संस्था,गडचिरोली व्दारे संचालीत यांच्या सयुक्त विद्यमाने ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११. ३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, डॉ.अनिल हिरेखन कार्यक्रमाचे अध्यक्ष उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, देवसुदन धारगावे प्रमुख मार्गशर्दक माजी सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई, दयानंद मेश्राम, प्रबंध संपादक, रोजगार नौकरी संदर्भ व नाथे पब्लीकेशन प्रा.लि.नागपूर,संजय नाथे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गडचिराली, माणिक चव्हाण तसेच पोलीस निरीक्षक,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, श्रीमती किनाके यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षांबाबतच्या शंकांचे निरसन केले. सदर कार्यशाळेत जिल्हयातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Bard AI) (Aaron Finch) (Hogwarts Legacy) (Victoria Gowri) (Ravi Shastri) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Gadchiroli) (The GDV)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here