– तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर जाहिरनामा प्रसिद्ध
The गडविश्व
गडचिरोली,३१ जुलै : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पेसा व नॉनपेसा क्षेत्रातील कोतवाल संवर्गाची पदभरती करण्यात येत आहे. याबाबतचा जाहिरनामा त्या त्या तालुक्यातील गावाचे चावळी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, कुरखेडा, कोरची तालुक्यातील कोतवाल भरती बाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
तालुकानिहाय पदभरती होणारे गाव
एटापल्ली तालुका : मौजा- हिकेर, कोईदवर्षी, सोहगांव, मंजीगड, एटापल्ली, जांभुळगट्टा व मंगुठा
मुलचेरा तालुका : नॉनपेसा क्षेत्रातील देवदा गावात इमाव प्रवर्गातून व सुंदरनगर गावामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गातील रिक्त जागांवर कोतवाल पदाची भरती
अहेरी तालुका : मौजा अहेरी, (महिला राखीव), चिंचगुंडी, बोरी, नागेपल्ली, आलापल्ली, कोडसेपल्ली, स. (महिला राखीव), कमलापूर, गोविंदगांव (महिला राखीव), जिमलगट्टा, देचली
धानोरा तालुका : कन्हालगाव, मेंढा, कामथळा, कोसमी, दुधमाळा, देवसुर, चर्विदंड, कटेझरी, मोहली, येरकड, पुलखल, मुंजालगोंदी, निमगाव
कुरखेडा तालुका : मौजा बोरटोला, कटंगटोला, हुऱ्यालदंड, लेंढारी, पळसगाव, कातलवाडा, चांदागड, पुराडा, तळेगाव, कुरखेडा व परिशिष्ट अ नुसार (शासन निर्णय २८ फेब्रुवारी ) घाटी, गोवारहुडकी उर्फ वागदरा, येरकडी.
कोरची तालुका : पेसा क्षेत्रातील बोटेझरी, कुकडेल, मर्केकसा, रानकट्टा , मुडीपार, टाहाकाटोला, कैमूल, चांदागोटा, न्याहाकल, लेकुरबोडी, बेडगांव, दंवडी, कोहकाबोडी, सुरवाही
कोतवाल पदाकरीता इच्छुक स्थानिक उमेदवरांनी जाहिरनाम्यामध्ये दिलेल्या पात्रतेचे निकष व विहित अटी व शर्तीवर अनुसुचित जमाती संवर्गातील आवश्यक अर्हताधारक उमेदवारांनी तहसिल कार्यालयातील विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने दिनांक 01.08.2023 ते 10.08.2023 पर्यंत तहसिल कार्यालयात अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.