The गडविश्व
गडचिरोली, ७ फेब्रुवारी : गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे तयार करण्यात आलेली उमेदवारांची लेखी परिक्षेकरीता अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याकरिता उमेदवारांकरीता महत्वाच्या सुचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत.
पोलीस भरती लेखी परीक्षा अंतिम गुणवत्ता यादी
सूचना
– ५ जानेवारी २०२३ पासुन गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई २०२१ करिता मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात आली होती.
पोलीस शिपाई भरती – २०२१ करीता महाराष्ट्र शासन राजपत्र गृह विभाग, २३ जुन २०२२ अन्वये शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार संबधीत प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणी साठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील.
सदरची लेखी चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी ही २० जानेवारी २०२३ रोजी उमेदवारांचे माहितीकरीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर यादीमध्ये उमेदवारांना आक्षेप नोंदविण्यासाठी २३ जानेवारी २०२३ चे सांयकाळी ०५:०० वाजेपर्यत मुदत देण्यात आली होती. आलेल्या आक्षेपांची पुर्तता करून अंतिम यादी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
लेखी चाचणी करीता पात्र झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा कोणत्या दिनांकास आयोजित करण्यात येणार आहे, याबाबत उमेदवारांना त्यांच्या भ्रमणध्वनी व ईमेल आयडीवर दिनांक व लेखी चाचणीचे स्थळ कळविण्यात येणार आहे.
उमेदवारानी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडु नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमके / पोलीस मुख्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.
(The Gadvishva) ( Gadchiroli Police Recrutment 2021) (Gadchiroli Newa Updates) (Thegdv)