गडचिरोली जिल्हा पोलीस भरती ; १९ जून पासून मैदानी चाचणी

1318

– दरदिवशी एका हजार पेक्षा अधिकांची होणार चाचणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई चालक भरती – 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 10 जागांसाठी तसेच गडचिरोली पोलीस शिपाई भरती – 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 912 जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणी १९ जून नते १२ जुलै २०२४ या कालावधीत गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पटांगणावर आयोजित करण्यात आलेली आहे.

किती अर्ज सादर ?

गडचिरोली पोलीस शिपाई चालकच्या 10 पदाकरिता 2258 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले असुन त्यापैकी 1967 पुरुष उमेदवार व 291 महिला उमेदवार यांचे आहेत. तसेच पोलीस शिपाईच्या 912 पदाकरिता एकुण 24570 उमेदवारांनी अर्ज सादर केले असुन त्यापैकी 16803 पुरुष उमेदवार व 7767 महिला उमेदवार यांचे आहेत.

पोलीेस शिपाई चालक पदाच्या एकुण 10 जागांपैकी अनुसुचित जाति- 01, अनुसुचित जमाति-02, भज(ब)-01, भज(क)- 01, इमाव-02, एसईबीसी-01, इडब्ल्युएस-01, अराखीव-01 अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार असुन ती १९ जून २०२३ ते २० जून या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. यासोबतच पोलीस शिपाई पदाच्या एकुण 912 जागांपैकी अनुसुचित जाति-121, अनुसुचित जमाति-210, विज(अ)-54, भज (ब)-50, भज (क)- 57, भज (ड)-46, विमाप्र-46, इमाव-158, एसईबीसी-50, इडब्ल्युएस-50, अराखीव-70 अशा स्वरुपात पदभरती घेण्यात येणार असुन ती २१ जून ते १२ जुलै २०२४ या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. पोलीस शिपाई चालक पदाकरीता दरदिवशी सरासरी 1000 उमेदवारांची व पोलीस शिपाई पदाकरीता दरदिवशी सरासरी 1300 उमेदवारांची शारिरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाच्या मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी, सर्व उमेदवारांनी आपले मैदानी (शारिरीक) चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे तसेच प्रवेशपत्रावर नमूद असलेल्या मैदानी (शारिरीक) चाचणी परिक्षेची तारिख लक्षात घेऊन मैदानी (शारिरीक) चाचणी करीता आवश्यक कागदपत्रासह पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे हजर राहणेबाबत गडचिरोली पोलीस दलामार्फत कळविण्यात येत आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने भरती

सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात येणार असुन यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरीक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची 1600 मी. धावणे (पुरुष), 800 मी. धावणे (महिला), 100 मी. धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणी करीता (RFID) Based Technology चा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology चा वापर करण्यात येणार आहे. मैदानी (शारिरीक) चाचणीमध्ये उत्तीर्ण होवुन लेखीपरीक्षेकरीता पात्र उमेदवारांची बायोमॅट्रीक पध्दतीने हजेरी घेवुन पडताळणी करण्यात येणार आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवुन शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. सोबतच काही उमेदवारांना वेगवेगळया पदाकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली अश्या उमेदवारांना दुसरी तारिख दिली जाईल. उमेदवारांना इतर काही अडचणी आल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येईल. सदर पदभरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा वापर करु नये, असे करतांना आढळुन आल्यास उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द करुन त्याचेवर प्रचलित कायद्यान्वये योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये तसेच कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष, दुरध्वनी क्र.8806312100 यावर तसेच उपविभागीय कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे माहिती द्यावी.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #policerecrutment #policebharti )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here