– जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट
The गडविश्व
गडचिरोली, १९ : चामोर्शी तालुक्यात बुधवारला दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसाने तालुक्यातील पविमुरांडा नजीकच्या मुतनुर येथील काशिनाथ धानु आतला यांच्या घरात पाणी शिरल्याने घरात ठेवलेले जीवनावश्यक साहित्य वाहून गेल्याची घटना घडली. त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात बुधवारी अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात चामोर्शी तालुक्यातील मुतनुर येथे मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले. यावेळी घरात असलेले जीवनावश्यक साहित्य वाहून गेले आहे. धो धो पावसाने संपूर्ण परिसरातील जनजीवन विस्कळित झाले होते. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेची चौकशी करून नुकसान भरपाई शासनाच्या वतीने देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #mutnur)