गडचिरोली : ४ जून ला मतमोजणीच्यावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी ‘हा’ मुख्य मार्ग राहणार बंद

2935

-उमेदवार व पक्षातील कार्यकर्ते मोठया संख्येने येणार ?
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने गडचिरोली-चिमुर (१२) लोकसभा मतदार संघातील मतमोजनीची प्रक्रिया ४ जून २०२४ रोजी कृषी महाविदयालय सोनापुर कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे पार पडणार आहे. सदर मतमोजनी चे ठिकाण गडचिरोली-चंद्रपुर राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे मतमोजनी प्रक्रियेदरम्यान उमेदवार व पक्षातील कार्यकर्ते मोठया संख्येने येण्याची शक्यता आहे. मतमोजनी दरम्यान सदर महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणुन सदर महामार्गावरील वाहतुक ४ जून चे सकाळी ०५.०० ते रात्री १२.०० वाजतापर्यंत बंद करण्यात येत आहेे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी सदर मार्ग बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर करु नये असे आवाहन जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन करण्यात येत आहे. तसेच मतमोजनीसाठी येणा­ऱ्या उमेदवार व पक्षांचे कार्यकत्यांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय जिल्हा परिषद च्या खुल्या मैदानात करण्यात आलेली आहे.

‘हे’ असतील पर्यायी वाहतुक मार्ग

१) जड वाहने – इंदिरा गांधी चौक – चामोर्शी रोड – सेमाना देवस्थान – आंनदानगर कॉलनी– कोर्ट चौक – चंद्रपुर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

२) हलके वाहने – आय.टी.आय चौक – एल.आय.सी. चौक – मा.सी.ई.ओ. बंगला चौक- शासकिय विश्राम गृह (सर्कीट हाउस) –जिल्हा सामाण्य रुग्णालय मार्गे चंद्रपुर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabha_election2024 #loksabhaelection2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here