गडचिरोली : आठवीतील विद्यार्थीनीने घेतला गळफास

307

The गडविश्व
गडचिरोली, २३ ऑक्टोबर : घरातील व्यक्तीन रागविल्याने आठव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत जिवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना वनश्री कॉलन कॉम्पलेक्स येथे शनिवारी रात्रोच्या सुमारास घडली. आर्या भास्कर बांबोळे (१५) रा. वनश्री कॉलनी असे मृतक विद्यार्थीनेचे नाव आहे.
मृतक आर्या ही नवेगाव येथील नवजीवन पब्लिक स्कूल येथे इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण झोती. शनिवारला अर्याला आईवडीलांनी काही कारणासाठी रागविले. यामुळे नाराज झालेल्या आर्याने घरात आई वडील नसतांना टोकाचे पाऊल उचलत सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घरातच गळफास घेत आर्याने आपली जिवनयात्रा संपविली. घटनेच्या वेळी आई लहान मुलाला शिकवणीतून आणण्यासाठी गेली होती दरम्यान घरी येताच बघते तर काय आर्याने गळफास घेतलेला होता. गळफास घेतलल्या अवस्थेत बघून आईने हंबरडा फोडला. घटनेची माहिती गडचिरोली पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मर्ग दाखल केला.

(The Gadvishva, The GDV, Gadchiroli News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here