गडचिरोली : वैनगंगा नदीपात्रात सहा महिलांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने खळबळ

2658

– युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : जिल्ह्यातुन एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी पुढे येत आहे. चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत (रै.) वाहणाऱ्या वैनगंगा नदीमध्ये सहा महिलांना घेऊन जाणारी नाव आज २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उलटल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून बुडालेल्या महिलांचा बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असून सायंकाळ ४ वाजता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोघांचे मृतदेह मिळाल्याचे कळते तर नाव चालवणारा नावी पोहता येत असल्याने बचावला असल्याचे समजते.
आज २३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे गणपूर येथील सहा महिला चंद्रपूर जिल्ह्यातील गावात मिरची तोडणीकरीता नावेने जात होत्या. दरम्यान काही अंतरावर गेल्यानंतर ऐन मधोमध नदीपात्रात नाव उलटली त्यामुळे त्यातील सहाही महिला पाण्यात बुडाल्या. यावेळी नाव चालक हा पोहता येत असल्याने कसाबसा बाहेर आला व एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला अपयश आले. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्यास तात्काळ सुरुवात केली. सायंकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सहा महिला त्या नावेमध्ये होते असे कळते त्यामधील दोघांचे मृतदेह आतापर्यत मिळाले असून इतर महिलांचा शोध घेण्याचे युद्धपातळीवर काम बचाव पथकाकडून सुरू असल्याचे कळते.
सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अद्याप या महिलांचे नावे कळू शकली नाही.

(the gdv, the gadvishv, gadchiroli chamorshi, Wainganga River, ganpur, chamorshi police, ndrf, sdrf, )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here