गडचिरोली : नक्षल्यांकडून आणखी एकाच्या हत्येने खळबळ

2061

– पोलीस खबऱ्या असल्याचा संशय
The गडविश्व
गडचिरोली, दि.०३ : जिल्हयात मागील काही दिवसांपासून नक्षल्यांचा धुमाकुळ सुरू असुन त्यांच्याव्दारे हत्यासत्रही सुरू आहे. मागील काही दिवसात नक्षल्यांनी तिघांची हत्या केल्याची घटना उघडीस आली होती. आता पुन्हा नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या सुरूवातीलात नक्षल्यांनी आणखी एकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्हयात खळबळ उडाली आहे. चमरा मडावी (वय ३८) रा. मुरकुटी ता. कोरची असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्येनंतर नक्षल्यांनी मृतदेहाजवळ पत्रकही टाकले असल्याचे कळते त्यात पेालीस खबरी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याचे समजते.
जिल्हयात मागील काही दिवसांपासून नक्षल्यांकडून हिंसक कारवाया होतांना दिसत आहे. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातुन महिनाभरात तिघांची हत्या नक्षल्यांनी केली. काल १ डिसेंबर पासुन नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू झाला असुन सुरूवातीपासुनच नक्षली करावाया सुरू असल्याचे दिसुन येत आहे. पहिल्याच दिवशी भामरागड तालुक्यात बॅनर व पत्रके टाकले. जिल्हयाच्य दक्षिण भागात तिघांची हत्या केल्यानंतर आता नक्षल्यांनी आपला मोर्चा उत्तरेकडील भागात वळवत आता कोरची तालुक्यातील मुरकुटी येथील चमरा मडावीची २ डिसेबरच्या मध्यरात्री हत्या केल्याची घटना उघकीस आली आहे. महिनाभरात तब्बल चार जणांच्या हत्येने जिल्हयात खळबळ उडाली असुन नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या सुरूवातीलाच अशा घटना समोर अल्याने पोलीस यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेला चमरा मडावी हा व्यक्ती कट्टर नक्षल समर्थक होता, त्याची बहीण एमएमसी परिसरातील विस्तार प्लाटून 3 ची माओवादी सदस्य असून डीव्हीसीएमची पत्नी आहे. मृतदेहाजवळ मिळालेल्या पत्रकात म्हटले आहे की तो आधी नक्षल्यांसाठी काम करत होता पण नंतर तो अनेक कंत्राटदारांकडून नक्षल्यांच्या नावावर पैसे गोळा करत होता. त्याला पोलीस खबरी म्हणूनही ओळखले गेले आहे. नक्षल्यांना राऊंड पुरवण्याच्या प्रयत्नात त्याला गेल्या वर्षी मध्य प्रदेशात बालाघाट येथे अटक करण्यात आली होती आणि काही महिन्यांपूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. या हत्येचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.

(the gadvishva, the gdv, gadchiroli news updates, naxal , gadchiroli police, korchi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here