गडचिरोली : बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र घोटाळा, आणखी आठ आरोपींना अटक

1263

The गडविश्व
गडचिरोली, ३० एप्रिल : सध्या संपुर्ण महाराष्ट्र राज्यात गाजत असलेल्या बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र घोटाळयाच्या गुन्ह्यामध्ये गडचिरोली पोलीसांनी गुन्हा दाखल होताच ०५ आरोपींना अटक केली होती. या बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी आणखी आठ आरोपींना अटक केल्याची माहिती पुढे येत आहे. आरोपीतांना पोलीस पथकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून सापळा रचून ताब्यात घेवून त्यांना कायदेशिर अटक केली व मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने प्रकरणाच्या तपासाची गती व व्याप्ती बघून आरोपींचा ०५ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेला आहे. आतापर्यंत एकुण १४ आरोपीतांना अटक करण्यात आली असून भविष्यात ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे असे पोलिस विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
प्राप्त महितीनुसार, गडचिरोली पोलिस भरती दरम्यान बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र घोटाळयाच्या गुन्ह्यामध्ये गडचिरोली पोलीसांनी गुन्हा दाखल होताच ०५ आरोपींना अटक केली होती. त्या ५ आरोपींनी खोटे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळविण्याकरीता आरोपी देविदास ऊर्फ बाळू देवराव मेश्राम याचे मार्फतिने मोठी रक्कम दिली असल्याचे तपासात निष्पन्न होताच पोलीस पथकांनी वनविभागात कार्यरत असलेल्या देविदास देवराव मेश्राम यांस अमरावती येथून ताब्यात घेवून अटक केली. तपासाचे गांभीर्य बघून मा. न्यायालयाने पोलीसांना तपासाकरीता पुरेशी संधी मिळावी याकरीता ०८ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला. त्या पोलीस कोठडी रिमांडदरम्यान आरोपी यांनी दिलेल्या माहीतीवरून ते देविदास मेश्राम याचे मार्फतिने रायगड पोलीस दलात कार्यरत असलेला सिद्धेश पाटील यांस खोटे प्रमाणपत्र मिळविण्याकरीता मोठी रक्कम पाठविली असल्याचे तपासात दिसून आले. आरोपींकडून मिळालेल्या माहीतीवरून सपोनि नितीन ऊईके यांचे नेतृत्वातील पोलीस पथक रायगड येथे रवाना करून तेथील स्थानिक पोलीसांची मदत घेवून सिद्धेश पाटील यांस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने ती रक्कम पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, जिल्हा सांगली येथे फॉरमासिस्ट या पदावर कार्यरत असणारा हौसाजी देशमुख यांस पैसे पाठवून खोटे प्रमाणपत्र मिळविले असल्याची माहीती दिली.
त्या माहीतीवरून पोउपनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वातील पोलीस पथक सांगलीकडे रवाना करण्यात आले. परंतु, आरोपी हौसाजी देशमुख हा म्हसवड, जि. सातारा येथे असल्याची खात्रीशीर माहीती मिळताच तेथील पोलीसांची मदत घेवून हौसाजी देशमुख यांस ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने खोटे प्रमाणपत्र तयार करण्याकरीता बीड येथील सत्तार शेख व पांडुरंग धलपे हे पैसे घेवून मदत करीत असल्याचे सांगीतले. गुन्हा दाखल होताच बीड येथे पोउपनि दिपक कुंभारे व पोउपनि सचिन सानप यांचे नेतृत्वातील पोलीस पथक तळ ठोकूण असल्याने त्यांना हौसाजी देशमुख यांनी दिलेली माहीती देण्यात आली. त्यावरून त्यांनी स्थानिक पोलीसांच्या मदतीने सत्तार शेख व पांडुरंग धलपे यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पांडुरंग धलपे हे पेशाने वकिल असून सत्तार शेख हे शासकिय कार्यालयांमध्ये नौकरीवर नसतांनादेखिल विविध कार्यालयांच्या संपर्कात राहुन माहीती मिळवित होता व त्या माहीतीच्या आधारे सर्व आरोपी संगणमत करून लोकांकडून मोठ्या रकमा स्विकारून खोटे प्रमाणपत्र तयार करून देत होते.
दर कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक, कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोउपनि पुरुषोत्तम वाडगुरे, पोहवा / नरेश सहारे, हेमंत गेडाम, पोना / सतिश कत्तीवार, राकेश सोनटक्के, दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, शुक्रचारी गवई, पोअं/ माणिक दुधबळे, सुनिल पुठ्ठावार, मंगेश राऊत, सचिन घुबडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, सुरेश चट्टी, प्रशांत गरफडे, मसफौ / लीला सिडाम या सर्व अंमलदारांनी अहोरात्र परिश्रम करून केलेली असून सदर तपासात सायबर पोलीस स्टेशन येथील पोउपनि निलेश वाघ व गायत्री नैताम यांची विशेष मदत मिळाली.

(the gdv) (the gadvishva) (muktipath serch gadchiroli) (gadchiroli news updates) (polis bharti 2023) (gadchiroli police bhharti certifacate) (Gadchiroli: Fake project certificate scam, eight more accused arrested)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here