गडचिरोली : कोंबडा कापला म्हणून बापाने केली मुलाची हत्या

2952

– आरोपी बापास जन्मठेप व दंडाची शिक्षा
The गडविश्व
गडचिरोली, १० ऑगस्ट : कोंबडा कापल्यावरून झालेला भांडणात बापाने चक्क स्वतःच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना ४ जानेवारी २०२१ रोजी घडली याप्रकरणी न्यायालयाने आरोपी बापास जन्मठेप व दंडाची शिक्षा आज १० ऑगस्ट रोजी सुनावली आहे. रामा गंगा कोडापे असे आरोपी बापाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मुलगा शंकर रामा कोडापे याने घरातील कोंबडा कापला असता वडील रामा गंगा कोडापे यांने माझा कोंबडा का कापलास ? या कारणावरून दोघांत भांडण झाले. भांडण विकोपाला पोहचल्याने वडीलाने मुलास बाजेवर धक्का देत घरातून जुनी वापरती लोखंडी कुऱ्हाडीच्या सहायाने मुलाच्या हातावर, पोटावर, तसेच पायावर सपासप वार करून निर्दयीपने हत्या केली व घनस्थळावरून पळ काढला. याप्रकरणी मृतकाची पत्नी राधा शंकर कोडापे (२५) हिने पोलीस स्टेशन जिमलगट्टा गाठून घडलेल्या घटनेची तोंडी रिपोर्ट दिली. दिलेल्या तक्रारीवरून अप क्र. ०१/२०२१ कलम ३०२ भादवी, ४/२५ भारतीय हत्या कायदा अन्वये गुन्हा नोंद केला.
सदर घटनेची पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप दाखल केले असता से के.क्र. ३६/२०२१ अन्वये मा. सत्र न्यायालयात खटला चालवुन आज १० ऑगस्ट २०२३ रोजी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद व साक्षदारांचे बयान ग्राहय धरुन कलम ३०२ भादवी मध्ये जन्मठेप व १० हजार रुपये रुपये द्रव्यदंड तसेच दंड न भरल्यास ६ महीने वाढीव शिक्षा ठोठावली.
यात सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोउपनि राहुल मंचकराव फड, उप पोलीस स्टेशन जिमलगट्टा यांनी केले तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.
(The gdv, the gadvishva, gadchiroli news, crime news )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here