गडचिरोली : अखेर पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या देवानंद नाकाडे वर गुन्हा दाखल

690

– तालुका पत्रकार संघाचे केली होती तक्रार
The गडविश्व
गडचिरोली, १४ जून : अवैध विटा व रेती तस्करीची बातमी प्रकाशीत केल्यामुळे पत्रकारांना अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी देवानंद रेवनाथ नाकाडे रा. कुंभिटोला ता. कुरखेडा यांच्या विरोधात कुरखेडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम २९४, ५०६ गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भांडेकर हे अधिकचा तपास करीत आहेत.
कुरखेडा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने चोर तो चोर वरून सिरजोर पणे वागणाऱ्या गुंडेशाही प्रवृत्तीने शिवीगाळ करणाऱ्या ठेकेदार देवानंद नाकाडे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणी करीता पोलीस स्टेशन ला धडक दिली होती. तालूक्यात सूरू असलेली अवैध रेती तस्करी तसेच तहसिलदार कूरखेडा यांच्या कार्यवाहीत रेतीची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आलेले ३ ट्रॅक्टर जप्तीच्या कार्यवाहीची बातमी वृत्तपत्रात प्रकाशीत केल्याचा राग मनात ठेवत पत्रकाराना अत्यंत अश्लील शब्दात शिवीगाळ करीत दम देणारा या व्यवसायाशी संबधित असलेल्या इसमावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मंगळवारी स्थानिक पत्रकार संघाचा वतीने पोलीस स्टेशन कूरखेडा येथे ठाणेदार संदीप पाटील यांची भेट घेत निवेदना द्वारे करण्यात आली.
तालूक्यात मोठ्या प्रमाणात अवैध विटा भट्टी, रेती उपसा सूरू आहे या संदर्भात वेळोवेळी स्थानिक पत्रकाराकडून बातम्या प्रकाशीत करण्यात येतात. विशेषता सती नदीच्या काठावर असलेला कूंभीटोला हा गाव रेती तस्करीचा केंद्र बिंदु आहे. कूंभीटोला घाट व येथील स्थानिक काही वाहतूकदार अवैध रेती तस्करी करीता कूख्यात आहेत. नूकतीच येथील तहसिलदार यानी आपल्या चमूसह मध्यरात्त्री सापळा रचत रेती तस्करी करताना तिन ट्रक्टर पकडले ही बातमी सूद्धा वृत्तपत्रात प्रकाशीत करण्यात आली होती हा राग मनात ठेवत या व्यवसायाशी संबंधित असलेला कूंभीटोला येथील इसम देवानंद रेवनाथ नाकाडे याने कूंभीटोला येथीलच निवासी असलेल्या एका पत्रकाराच्या घरासमोर व स्वस्त धान्य दुकान कुंभीटोला येथे त्यांचा घरातील पूरूष मंडळी उपस्थित असताना अश्लील व अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ पत्रकाराना उद्देशून करीत होता यावेळी या शिवीगाळची दहा मिनटाची आडीओ क्लीप सूद्धा रेकार्डिंग करण्यात आलेली आहे. सदर माहीती व तक्रारीचे निवेदन ठाणेदार संदीप पाटील यांना देण्यात आले. सोबतच पत्रकाराचे लहान बंधू हे घटनास्थळी उपस्थित होते त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनला तोंडी तक्रार सुद्धा केली आहे.
पत्रकाराना शिवीगाळ करणारा देवानंद नाकाडे हा गूंड प्रवृत्तीचा असून यापूर्वी सूद्धा त्याच्या विरोधात कूरखेडा पोलीस स्टेशन येथे शिवीगाळ व भांडण प्रकरणात ३ वेळा अदखल पात्र गून्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे मात्र त्याचा विरोधात ठोस कार्यवाही न झाल्याने त्याची हिम्मत वाढलेली असून तालूक्यात रेती तस्करी हा अवैध व्यवसाय संघटीतपणे करण्यात येत असल्याने या अवैध व्यवसायाच्या बातम्या प्रकाशीत करणाऱ्या पत्रकारावर तस्कराकडून गंभीर हल्ल्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामूळे वेळीच यांचा मूस्क्या आवळणे गरजेचे आहे सदर बाब सूद्धा चर्चे द्वारे पत्रकार संघाचा पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार संदीप पाटील यांचा निदर्शनात आणून दिली होती. तसेच काल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस ठाणे कुरखेडा येथे देवानंद नाकाडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, kurkheda police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here