-दुसरा गंभीर जखमी
The गडविश्व
गडचिरोली, १३ जुलै : गावठी कुत्र्यांच्या तावडीत चितळांची जोडी सापडली असता वनविभागाने सोडवून जीवनदान दिल्याची घटना बुधवार १२ जुलै रोजी गडचिरोली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रं .१७२ मध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या गडचिरोली नपरिक्षेत्रातील कक्ष क्रं १७२ मध्ये चितळाचा कळप फिरत होता. दरम्यान शहरालगत असलेल्या परिसरातील गावठी कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. याबाबत वनविभागाच्या पथकाला माहिती मिळताच कर्मचार्यांनी तत्काल घटनास्थळ गाठून कुत्र्यांच्या तावडीतून दोन चितळाची सुटका केली. मात्र त्यापैकी एका चितळाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी होता त्याला लगेच पशुवैद्यकीय दवाखान्यात नेत उपचार करण्यात आले.
सदर संपूर्ण कारवाई उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या वेळी सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्र सहाय्यक श्रीकांत नवघरे, वनरक्षक बी पी राठोड, जलद बचाव दलाचे सदस्य अजय कूकडकर, पंकज फरकाडे, गुणवंत बाबनवाडे, निखिल बारसागडे, मकसुद सय्यद, योगेश हजारे यांनी परिश्रम घेतले. व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उदय कोराने, डॉ. हेमंतकुमार कोवाची, डॉ.जितेश कुमरे यांनी त्यावर उपचार कले.