गडचिरोली : कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण

239

– येणापूर येथील ओम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, १ ऑगस्ट : सारथी संस्थेमार्फत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी चामोर्शी तालुक्यातील एमकेसीएलच्या निवडक केंद्रावर मोफत संगणक व व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन येणापूर येथील ओम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे (Om Computer Institute) संचालक संदीप मारोती कुरवटकर यांनी केले आहे.
छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र नॉलेज कापोरेशन लि. पुणे या प्रशिक्षण संस्थेमार्फत संपुर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरापर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सारथी संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला असून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटाच्या १८ ते ४५ या वयोगटातील उमेदवाराकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात तालुकास्तरापर्यंत सारथी संस्थेमार्फत निशुल्क (मोफत) व्यक्तीमत्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी सारथी लक्षित गटातील पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सारथी सर प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि. पुणे या संस्थेमार्फत राबविण्यात येत असून गडचिरोली जिल्हयातील एमकेसीएलच्या निवडक अधिकृत अध्ययन केंद्रावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश, आयटी स्क्लि हे दोन अभ्यासक्रम शिकविले जाणार असून इतर दोन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडायचे आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असलेले स्क्लि शिकता येतील व स्वत: च्या पायावर उभे राहता येईल. सदर प्रशिक्षणासाठी विषय संपूर्ण माहिती घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mkcl.org/csmsdeep या संकेतस्थळाला भेट द्यावी असे अवाहन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक संदीप मारोती कुरवटकर यांनी केले आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli, Om Computer Institute  yenapur, mkcl)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here