गडचिरोली : गांजा तस्करीचा डाव फसला, तब्बल १५० किलो गांजा केला जप्त

1416

– २० लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक
The गडविश्व
गडचिरोली, २३ जुलै : छत्तीसगड राज्यातून होत असलेल्या गांजा तस्करांच्या असरअल्ली पोलिसांनी मुसक्या आवळत तब्बल १५० किलो गांजासह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई रविवार २३ जुलै रोजी केली. याप्रकरणी शिव विलास नामदेव व ज्योती सत्येंद्र वर्मा, दोन्ही रा. उत्तरप्रदेश यांचे यांना अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी व ईतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.
रविवार २३ जुलै रोजी असरअल्ली पोलीस स्टेशनचे सपोनि राजेश गावडे यांना छत्तीसगड राज्यातून चारचाकी वाहनाने अंमली पदार्थ (गांजा) असरअल्ली कडे येत असल्याची गोपनिय खात्रीशीर माहिती मिळाली असता असरअल्ली ते पातागुडम रोडवरील फॅरेस्ट नाक्याजवळ सापळा लावला. दरम्यान वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता वाहन रोडच्या खाली उतरवून वाहनातील एक महिला व एक पुरुष यांनी पळ काढला असता पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग करुन मोठ्या शिताफीने एक महिला व एक पुरुषास पकडले व त्यानंतर सदर कारची पाहणी केली असता कारच्या मागील डिक्कीमध्ये ३६ लहान बॉक्स मिळून आल्याने सदर बॉक्समध्ये अंदाजे १५० किलो अंमली पदार्थ (गांजा) अंदाजे किंमत १५,००,०००/- (पंधरा लाख रुपये) व सदर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन ( रेनॉल्ट डस्टर) क्र. एम एच ३४ ए एम ५५०१ अंदाजे किंमत ५,००,०००/- ( पाच लाख रुपये) असा एकुण अंदाजे किंमत २०,००,०००/- ( वीस लाख रुपये) चा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशन असरअल्ली येथे आणून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. राजेश गावडे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा सुहास शिंदे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. राजेश गावडे यांचे नेतृत्वात पोअं/ जगन्नाथ कारभारी, पोअं/ दिलीप ऊईके, पोअं/ शंकर सलगर, पोअं/ आदिनाथ फड यांनी पार पाडली.
(the gev, the gadvishva, gadchiroli news, crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here