– विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : जिल्ह्यात दारूबंदी असताना छुप्या मार्गाने दारूची तस्करी करून विक्री केली जाते. असे असताना जिल्ह्यात चंद्रपूर येथून दारूची मोठी खेप वाहतूक होणार आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेची चमू आगामी निवडणुक २०२४ च्या पाश्र्वभुमिवर गडचिरोली परिसरात गस्त करीत असतांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पोरेड्डीवार इंजिनिअरींग कॉलेज, बोदली परिसरात सापळा रचून असतांना दोन वाहने समोरून येतांना दिसताच त्यांना थांबवून वाहनांची तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारुचे 130 खरद्यांचे बॉक्स मिळून आले. सदर दारुचे बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण १२,०५,०००/- रु. चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून वाहनातील आरोपी आकाश भाऊराव भरडकर, रा. गोकुळनगर, रोशन हरिदास लोखंडे, रा. उंदरी, ता. उमरेड, जि. नागपूर यांना अटक करून त्यांचे व पाहिजे असलेले आरोपी मनोज मुजुमदा, रा. एटापल्ली व क्रिष्णा मुजुमदार, रा. कसनसुर यांचे विरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि. राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोअं/ प्रशांत गरफडे, नामदेव भटारकर, चापोअं/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice #muktipath )