गडचिरोली : दारुसह ९ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

792

– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, २९ जुलै : गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांचे दोन पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकानी सापळा रचून दारूसह ९ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई २९ जुलै रोजी करण्यात आली. सदर कारवाईने अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
मिळाल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचा एक पोलीस पथक मुरखळा गावात जाणा­ऱ्या रस्त्यावर पाळत ठेवले असता दुचाकी वरुन २८ हजार ८०० रुपये किंमतीच्या २ बॉक्स विदेशी दारुची वाहतुक करतांना मिळुन आल्याने अमित यशवंत रोहणकर (२५) रा. मोखाडा ता. सावली जि. चंद्रपुर यांस मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेवुन पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तर दुसरे पोलीस पथक कोटगल चौकात सापळा रचुन बसले असतांना एका संशयीत दुचाकी वाहन येत असल्याचे दिसल्याने वाहनाची तपासणी केली. वाहन चालक व मागे असलेल्या ईसमाच्या मध्ये ४० नग विदेशी दारुच्या बाटला मिळुन आल्याने येलंधर मलय्या गनबोईनवार (४७) रा. कनेरी ता.जि. गडचिरोली, विनोद मधुकर मेश्राम (२८) वर्षे, रा. पारडी ता. जि. गडचिरोली यांना मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेवुन पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
गडचिरोली कॉम्प्लेक्स परीसरात नाकाबंदी दरम्यान एका संशयीत वाहनास थांबण्याचा ईशारा करताच वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी करुन दरवाजा उघडुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांस ताब्यात घेवुन त्याचे व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता, वाहनात २ लाख ४८ हजार रुपये किंमतीच्या देशी दारुचे एकुण ३१ बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी मिळुन आल्याने आकाश पुरुषोत्तम कापकर (३०) व्यवसाय – वाहन चालक, रा. सर्वोदय वार्ड क्रमांक ४, गडचिरोली ता. जि. गडचिरोली याचेविरुध्द पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
एकाच रात्रो अशा एकुण वेगवेगळ्या तीन घटनामध्ये २ लाख ८८ हजार ८०० रुपये किंमतीचा दारु मुद्देमाल व ६ लाख ६० हजार रुपये किंमतीचे दारु वाहतुकीकरीता वापरलेले वाहन असा एकुण ९ लाख ४८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे, सपोनि राहुल आव्हाड, यांचे नेतृत्वात नापोशि/दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, सतीश कत्तीवार, पोअं/ श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, मंगेश राऊत, चापोना/मनोहर तोगरवार, माणिक निसार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here