गडचिरोली : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

92

– आमदार डॉम देवराव होळी यांनी मानले राज्य व केंद्र सरकारचे आभार*
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हे त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. आज ९ ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा दूरदृश्य प्रणाली द्वारे संपन्न होणार आहे.
गडचिरोली येथे शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी अथक प्रयत्न केले. तत्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना घेराव घातला. महायुतीचे सरकार आल्याबरोबर पहिल्याच प्रवासामध्ये आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मागणीच्या प्रभावाने गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे या महाविद्यालयाच्या कामाला गती आली असून अखेर या महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यामुळे गडचिरोली येथे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हे आमदार डॉ.देवराव होळी यांचे स्वप्न साकार होत आहे. याबद्दल आ.डॉ. देवराव होळी यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले व यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अभिनंदन केले.
गडचिरोली जिल्ह्याला महाविद्यालय मिळवून देणारे आमदार डॉ. देवराव होळी यांचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here