गडचिरोली : भुईमुग पिक धोक्यात !

570

– निसर्गाचा बदल व आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (नरेश ढोरे), २८ जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा,धानोरा व गडचिरोली तालुक्यातील काही भागात भुईमुग पीक हे प्रामुख्याने घेतले जाते. भुईमुग हे पीक शेतकऱ्यांना भरभराटीस आणणारे पीक असून हे पीक जमिनीत उत्पादित होत असल्याने या पिकावरील रोगाबाबत शेतकरी अजूनही अनभिज्ञ आहेत, तसेच या पिकावरील रोग नियंत्रण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अजूनही जोड मिळालेला नसून कृषी विभाग किंवा कृषी विषयक माहिती देणाऱ्या संस्था यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही भुईमूग पिकाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली नसून शेतकरी तेच ते बियाणे वापरून त्याच मातीत दरवर्षी भुईमुगाचे पीक घेण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु बीज उत्पादन करणारी कंपनी किंवा कृषी विभागामार्फत आधुनिक पद्धतीचे बियाणे आणि आधुनिक औषध उपचार याबाबत कुठलाही पुरवठा होत नसल्याने कृषी केंद्रात मिळेल ती औषधे वापरतात आणि त्या उत्पन्नावर समाधान मानून आपली उपजीविका भागवितांना दिसत आहेत.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भुईमुगाच्या उत्पादनात भरपूर घट आलेली आहे. भुईमुगातील शेंगा काळ्या पडणे किंवा भुईमुगाला शेंगा येऊनही शेंगा पूर्णपणे न भरणे, झाड हिरवेगार असूनही त्या झाडाला एकही शेंगा नसणे, झाड फूलांवर आल्यावर मरणे अशा प्रकारचे विविध रोग आज-काल भुईमुंग पिकावर दिसून येत आहेत. परंतु याकडे शासकीय यंत्रणा किंवा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाय अजुनही माहिती नसल्यामुळे शेतकरी अनभिज्ञ आहेत. कृषी विभागाने भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांना पुरेशी माहिती किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व आधुनिक औषधोपचार कशाप्रकारे करावा याबद्दलची माहिती देणे अतिशय आवश्यक आहे अशी शेतकऱ्यांची मागणी असून या पिकाला शासनाकडून कोणत्याही प्रकारचा हमीभाव नाही, खुल्या बाजारात विकल्याही जात नाही. शेतकरी या वर्षी भुईमुगाच्या पिकात अंशतः तोटा झाल्याचे सांगत आहेत.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Bhuimug) (Falli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here