– कारण गुलदस्त्यात
The गडविश्व
गडचिरोली, २८ मे : शेतशिवारातील झाडाला गळफास घेतल्याची घटना २७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आष्टी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या लेझरी येथे घडली. लक्ष्मण चांदेकर (५७) Lakshman Chandekar रा. मलेझरी असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे.
मृतक लक्ष्मण चांदेकर यांनी सकाळच्या सुमारास स्वतःकडे असलेली बैलजोडी विकली व त्यानंतर शेजारच्या गावात मोठ्या बैलास जोड घेतो असे घरातील व्यक्तींना सांगितले. यावेळी उण अधिक असल्याने त्यांना मनाई करण्यात आली मात्र काही एक न ऐकता घरुन निघून गेला व स्वतःच्या शेतशिवारात असलेल्या झाळाला गळफास घेतली. गळफास घेतली असल्याची माहिती सायंकाळी कुटुंबाला माहिती होताच आष्टी पोलिस ठाण्यात कळविले असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मात्र गळफास का घेतला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.©©© (टीप : बातमी स्वमनाने लिहिता येत नसेल तर कॉपी पेस्ट जशीच्या तशी करा)
(the gdv, the gadvishva, the gadvishva, gadchiroli ashti)