– अजब गजब मागणीने आश्चर्य
The गडविश्व
गडचिरोली, २६ जुलै : आपल्या क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी आमदार जास्त निधी खेचून आणत असतात मात्र गडचिरोली चे आमदार डॉ. होळी हे गडचिरोलीचा विकास झाला गडचिरोलीया मिळणार ‘सीएसआर चा ३० टक्के निधी बंद करावा अशी अजब गजब मागणी विधिमंडळात केली आहे. याबाबतची व्हिडियो चित्रफीतही समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून अनेक स्तरातून त्यांच्यावर टिकाही करण्यात येत आहे.
आमदार डॉ. होळी हे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातुन भाजपकडून दोनदा निवडून आले. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार डॉ. होळी यांनी गडचिरोलीचा विकास झाला, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोलीला सीएसआर चा ३० टक्के निधी दिल्याने शासनाचे नुकसान होत आहे असा दावा केला. यापूर्वी तलाठी भरतीत ओबीसींवर अन्याय होत असल्याने भरतीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यावर एका आदिवासी तरुणाने त्यांना फोन करुन विचारणा केली असता ‘तुझ्या एका मताने निवडून येतो का?’, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिल्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती तर आता सीएसआर चा ३० टक्के निधी दिल्याने शासनाचे नुकसान होत आहे, गडचिरोली जिल्ह्याचा विकास झाला आता निधीची आवश्यकता नाही अशी मागणी केल्याची व्हिडिओ चित्रफीतही समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे आमदार डॉ. होळी पुन्हा एकदा चर्चेत आले असून विविध स्तरातून त्यांच्यावर टीकाही होत आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, MLA Dr Holi)