गडचिरोली : शाळेतील शेकडो विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा

1790

– उडाली एकचं खळबळ
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.२० : जिल्ह्यातील एका आश्रम शाळेतील जवळपास १०० विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना २० डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे.
धानोरा तालुक्यातील सोडे येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या माध्यमातून शासकीय मुलींच्या आश्रम शाळेत ३६९ आदिवासी मुली निवासी स्वरूपात शिक्षण घेतात. त्यापैकी आज ३५८ विद्यार्थीनीं पठावर उपस्थित होते. शाळा सकाळ पाळीत भरल्या नंतर नेहमीप्रमाणे आज बुधवार २० डिसेंबर ला दुपारी १२.०० वाजता मुलींनी जेवण केले. जेवणात आलू, गोबी, वरण भात याचे भोजन केल्यानंतर काही वेळाने विद्यार्थिनींच्या पोटात दुखने, काहींना चक्कर येणे तर मळमळ वाटणे सुरू झाले. याची तक्रार विद्यार्थिनींनी शाळेच्या शिक्षकांकडे केली. नंतर आश्रम शाळेतील अधीक्षक यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सावसागडे यांना फोन द्वारे कळविण्यात आले. लगेच रुग्णवाहिका चालक यांनी रुग्णवाहिकेत मुलींना ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले. रुग्णालयात दाखल केलेल्या मुली ६ ते १८ वयोगटातील असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यातच परत सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान उर्वरित मुलींना बाकीच्याच सारखा त्रास सुरू झाल्याने १५ विद्यार्थ्यांना उपचारासाठी ६.००वाजता ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तर ४७ मुलींना गडचिरोली येथे हलविण्यात आल्याचे कळते.
सोडे येथील आश्रम शाळेतील मुलींना जेवणातून विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने येथील कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे. ३५८ पैकी १०६ मुलींनांच विषबाधा झालीच कशी ? तेहि जेवन झाल्या नंतर लगेच न जानवता उशिरा कसे काय? स्वयंपाक बनविलेले गंज वेगळे होते काय? यात कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा झाला नसेल कशावरून ? असे अनेक प्रश्न पालक उपस्थित करताना दिसत असून सदर घटनेने एकचं खळबळ उडाली आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here