गडचिरोली : चितळाची शिकार करून मास शिजविणे पडले महागात, वनविभागाने आवळल्या मुसक्या

3691

शिजविलेल्या मांसासह चौघे जण ताब्यात
The गडविश्व
गडचिरोली, दि.०१ : चितळाची शिकार करून मास शिजवून खाण्याचा चौघांनी बेत आखला मात्र याची भनक वनविभागास लागताच वन कर्मचाऱ्यांनी त्यांना शिजविलेल्या मासासह घरून ताब्यात घेत गुन्हा दाखल केल्याची घटना ३० मार्च रोजी गिलगाव (जमीनदारी) येथे करण्यात आली. सदर कारवाईने खळबळ उडाली आहे.
पंकज पिंपळवार, अरूण विठ्ठल भोयर, रोहिदास शंकर मडावी दाेघेही रा. गिलगाव (जमिनदारी) व विलास काशिनाथ बोदलकर रा. बांधोना असे आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चामाेर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात चौघांनी चितळाची शिकार केली. शिकार केलेल्या चितळाच्या मासाची वाटणी झाली त्यानंतर ते शिजवत असतांना यांची भनक वनविभागास लागली. त्यानुसार शनिवारी दुपारी १ ते १.३० वाजताच्या दरम्यान वनकर्मचाऱ्यांनी गिलगाव येथील संशयीत आरोपी पंकज शंकर पिंपळवार याच्या घराची पाहणी केली असता वन्यप्राण्याचे कापून तुकडे केलेले मांस आढळून आले. त्यावरून त्याची चौकशी करून मांस, ताब्यात घेऊन पंचासमक्ष जप्तीनामा व पंचनामा केला. दरम्यान आरोपी पंकज पिंपळवार याला कुनघाडा रै. वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून चौकशी करून त्याचा कबुली जबाब नोंदविला असता यावेळी त्याने अरूण विठ्ठल भोयर, रोहिदास शंकर मडावी दाेघेही रा. गिलगाव (जमिनदारी) व विलास काशिनाथ बोदलकर रा. बांधोना आदींचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले. त्यानुसार सर्व चारही आराेपींविरूध्द वनगुन्हा नोंद करण्यात आला इतर सर्व कार्यवाही पूर्ण करून आराेपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
प्रकरणाचा पुढील तपास गडचिराेली वन विभागाचे सहायक वनसंरक्षक धीरज ढेंबरे, वन परिक्षेत्र अधिकारी एम. एम. तावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक एस. जी. झोडगे, वनरक्षक के. एम. मडावी हे करीत आहेत.
(#thegdv #gadchirolinews #gadchiroliforest #thegadvishva #crimenews #loksabhaelection2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here