The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या दारू विक्री व वाहतूक केली जाते. यावर कठोर कारवाई करत, जिल्ह्यातील पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला एकूण १५,६०,१९४/- रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
पोस्टे गडचिरोली येथे दाखल असलेल्या ८७ गुन्ह्यांमधील दारूबंदी कायद्यांतर्गत जप्त केलेला मुद्देमाल २८ मार्च २०२५ रोजी न्यायालय व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या परवानगीने नष्ट करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर देशी व विदेशी दारूच्या बाटल्या आणि बिअरच्या कॅनचा समावेश असलेल्या या मुद्देमालाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या व कॅन जेसीबीच्या साहाय्याने १५ फूट खोल खड्ड्यात टाकून रोड रोलरने चुरडण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आला, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #ipl2025