गडचिरोली : पोलीसांवर हल्ला करणाऱ्यास कारावास

683

– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, १५ मार्च : पोलीस पाटलाच्या रक्षणाकरिता गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीस गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी कलम ३२४ भादवी २ वर्ष ८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
राजेशाम बालमल्लु दुर्गम (४०) रा. जाफ्राबाद ता. सिरोंचा असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३० जून २०२० रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान मोकेला गावचे पोलीस पाटील हे आरोपीस पोलीस स्टेशन बामणी येथे हजर राहण्याबाबत सांगण्याकरीता गेले असता आरोपीने गळयावर कुऱ्हाड ठेवुन जिवानिशी ठार मारतो , माझा जीव धोक्यात असून माझा बचाव करा अशी माहिती बामणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना फोन व्दारे दिली असता. घटनास्थळी पोलीस पथक गेले. दरम्यान आरोपीने प्रभारी अधिकारी यांचे छातीवर डाव्या बाजुस कुऱ्हाडीने वार केला. तसेच पोलीस शिपायाच्या डोक्यात विळयाने वार करून गंभीर जखमी केले व त्याच्या मदतीला गेलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला सुध्दा त्याने विळयाने वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात उप पोस्टे बामणी अप.क्र. ०७/२०२० कलम ३०७,३५३,३३२,३३३ भादवी अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला.
पोलीस यंत्रणेने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात से.के.क्र. ७१/२०२० अन्वये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून आज १५ मार्च २०२३ रोजी आरोपी राजेशाम बालमल्लु दुर्गम याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी कलम ३२४ भादवी २ वर्ष ८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोउपनि / सुधीर महादेवराव घुले व पोउपनि उदय विष्णु पाटील उपपोस्टे बामणी यांनी केला आहे. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.

(The Gadvishva) (The Gdv) (Gadchiroli news updates) (Gadchiroli: Imprisonment for those who attacked the police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here