गडचिरोली : तालुकास्तरीय स्पर्धेत चुरचुरा जि. प. शाळेचे यश

282

The गडविश्व
गडचिरोली, दि.३० : तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाचे आयोजन तालुक्यातील बोदली येथे करण्यात आले होते. यात खो-खो स्पर्धेत प्राथमिक गटातून चुरचुरा येथील जि.प. शाळेच्या मुलींनी घवघवीत यश संपादन करीत प्रथम क्रमांक पटकाविला.
काटली केंद्राअंतर्गत येणाऱ्या विविध शाळांचे क्रीडा संमेलन चुरचुरा येथे पार पडले. खो-खो स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करीत चुरचुरा जि.प. शाळेच्या प्राथमिक गटातील मुलींनी प्रथम येण्याचा मान पटकाविला व तालुकास्तरावर झेप घेतली. तालुकास्तरीय स्पर्धेत सुद्धा चमकदार कामगिरी करीत अव्वल क्रमांक पटकाविला. यासाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक बांबोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गेडाम, शाव्यस तथा ग्रापं सदस्य नलूताई म्हशाखेत्री, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक व पालकांनी कौतुक केले.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, gadchiroli, churchura, zp school)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here