गडचिरोली : बँक ऑफ महाराष्ट्र च्या स्थानांतरीत शाखेचा उदघाटन सोहळा संपन्न

209

– सीईओ आयुषी सिंग यांच्या हस्ते उदघाटन
The गडविश्व
गडचिरोली, दि.२० : गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील बँक ऑफ महाराष्ट्र च्या स्थानांतरीत शाखेचे उदघाटन सोमवार २० नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे कारगिल चौक येथे स्थानांतर करण्यात आले. आज सोमवार २० नोव्हेंबर रोजी स्थानांतरित शाखेचे उदघाटन करण्यात आले. दरम्यान आजपासून बँकेचे संपूर्ण व्यवहार कारगिल चौकातील स्थानांतरीत शाखेत सुरू करण्यात आले. यावेळी खातेदारांनी चांगला प्रतिसाद देत बँकेत हजेरी लावली.उदघाटन समारंभाला उदघाटक म्हणून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, विशेष अतिथी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर तसेच अंचल प्रबंधक प्रमोद साबळे, शाखा प्रबंधक प्रविण लाटकर, माधमशेट्टीवार, व्यापारी असोशीयनचे अध्यक्ष रवी चन्नावार, कपडा व्यावसायिक मनोज देवकुले, संजय गुप्ता, गंदेवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा प्रबंधक प्रविण लाटकर, संचालन व आभार अश्विनी इटनकर यांनी मानले.
आजपासून स्थलांतरित नव्या शाखेत बँकेचे संपूर्ण व्यवहार सुरू झाले असल्याची माहिती शाखा प्रबंधक प्रविण लाटकर यांनी ‘The गडविश्व’ न्यूज शी बोलतांना दिली.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, kargil chouk, bank of maharshtra gadchiroli, ayushi singh)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here