गडचिरोली : गांजा तस्करी प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

102

– सात लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, १ जून : वाहनातून अवैधरित्या गांजाची तस्करी करत असतांना स्थानिक गुन्हे शाखेन शनिवारी २७ मे रोजी आरोपींना ताब्यात घेत साडेतीन किलो गांजासह ७ लाख १९ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आरोपींना न्यायालयात दाखल केले असता ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र काल पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २ जून पर्यंत पोलीस कोठउीत वाढ केली आहे.
शनिवारी गडचिरोली येथे गोपनिय माहितीच्या आधारे सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने १ महिलेसह तिघांना अवैध गांजा तस्करी करतांना अटक केली. सदर कारवाईने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आशिष धनराज कुळमेथे (२८) रा. संजयनगर, धनराज मधुकर मेश्राम (३३) रा. नेहरूनगर, ज्योती श्रीकृष्ण परचाके (२२) रा. शास्त्रीनगर तिघेही जि. चंद्रपरू यांचा समावेश आहे. जिल्हयात अवैध धंदयाना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षकांनी मुठ आवळली असुन पोलीस अधिक्षक नव्याने नियुक्त झाल्यापासून अनेक कारवाव्या करण्यात आल्या आहेत.
©©© (टीप : बातमी स्वमनाने लिहिता येत नसेल तर कॉपी पेस्ट जशीच्या तशी करा)
(the gdv, the gadvishva, gadchiroli police lcb , gadchiroli lcb, ganja, indiranagar, Gadchiroli: Increase in police custody of the accused in the ganja smuggling case)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here