गडचिरोली : लोकमान्य गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम, ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान

674

– रक्तदान शिबीर व मोफत सिकलसेल तपासणी शिबीर संपन्न
The गडविश्व
गडचिरोली (सचिन जिवतोडे), २१ सप्टेंबर : येथील आरमोरी मार्गावरील लोकमान्य गणेश मंडळाच्या वतीने यंदाही अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. आज गुरुवार २१ सप्टेंबर रोजी मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी पार पाडत व रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत भव्य रक्तदान शिबीर व मोफत सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण ३० रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
राज्यात गणेश मंडळाच्या वतीने विविध अभिनव स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतात. तसेच यंदा राज्य शासनातर्फे उत्कृष्ट गणेश सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गडचिरोली येथील लोकमान्य गणेश मंडळाने सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत मंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाच्या आधारे गुणांकन केले जाणार आहेत व त्यातून उत्कृष्ट गणेश मंडळाला पूरस्कृत केले जाणार आहे.लोकमान्य गणेश मंडळातर्फे आज गुरुवारी भव्य रक्तदान शिबिर व मोफत सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ३० रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले. या रक्तदानामुळे रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा काही प्रमाणात कमी होणार आहे. यावेळी सुरज खोबरागडे, गणेश भोपये,भास्कर पिपरे, महेश मडावी, सचिन राठोड, किरण नैताम, शुभम बलमवार, आकाश खोबरागडे, अरविंद नरोटे, प्रतीक चल्लेवार, विजय नरोटे, दिपम गिरी, महेश तिडके, सुरज सातपुते, मयूर ठाकरे, आकाश बघेल, शुभम जनबंधु, अभिषेक मरशेट्टीवार, चंद्रशेखर खोब्रागडे, मनोज इरकापे, सिद्धार्थ चौधरी, अभिषेक गंडाटे, युनेश्वर कोसलकर, प्रशांत अस्तीवार, प्रफुल शेंडे, आयुश शिवणकर, शुभम तगडपल्लीवार, शुभम मेश्राम, देवेंद्र लाखनकर, अमृत माटशेट्टीवार यांनी रक्तदान केले.
तसेच यावेळी रक्तपेढीचे डॉ. अशोक तुमरेटी, डॉ.शक्ती सागर, पीआरओ सतीश तडकलवार, निलेश सोनवने, तंत्रज्ञान प्रफुल राऊत, सहायक हरीश टेकाम, वाहन चालक बंडू कुंभारे आदींनी सहकार्य केले.
यापुढेही नवीन विविध उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येणार आहे असे मंडळातर्फे सांगण्यात आले.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, lokmanya ganesh mandal gadchiroli, gadchiroli cha raja ganesh mandal, gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here