– नागरिकांत भिती निर्माण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : जिल्हयात दोन वर्षांपूर्वी ओडिशा राज्यातुन शिरकाव केलेल्या रानटी हत्तीचा कळप मौशीखांब -मुरमाडी जंगल परिसरात असुन काल २१ ऑक्टोबर च्या रात्रो ८ वाजताच्या सुमारास एका रानटी हत्तीने चांभार्डा गावामध्ये शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतचा व्हिडिओही समाजमाध्यमावर व्हायरला झाला आहे.
ओडिशा राज्यातून रानटी हत्तीने गडचिरोली जिल्हयात प्रवेश करीत धुकाकुळ माजवला आहे. कधी लगतच्या गोंदिया तर कधी भंडारा जिल्हयातील जंगल परिसरात प्रवेश करीत पुन्हा गडचिरोली जिल्हयात प्रवेश करीता धुमाकुळ माजवतांना दिसुन येत आहे. गडचिरोली जिल्हयातील उत्तर, पूर्व तसेच दक्षिण भागात रानटी हत्तीच्या कळपाने मार्गक्रमण करीत शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. तोडाघाशी आलेले आलेले धानपीक पायदळी तुडवीत अतोनात नुकसान करीत रानटी हत्तीने केले आहे. वनविभागाची चमु रानटी हत्तीच्या कळपावर पाळत ठेवत आहे. हुल्ला पार्टी व्दारे हत्तीना गावपरिसरात येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. मात्र तरीही जवळपास २८ च्या संख्येत असलेल्या रानटी हत्तीने धुमाकुळ माजवत आहे. यापुर्वी राजटी हत्तीच्या हल्ल्यात नागरिकांचा जिवही गेला आहे.
आता सदर रानटी हत्तीचा कळप मौशिखांब – मुरमाडी जंगल परिसरात दाखल झाला असुन चांभार्डा गावामध्ये या कळपातील एका हत्तीने रात्रोच्या सुमारास प्रवेश केला. मात्र यात कोणतीही वित्तहानी व जिवीतहानी झाली नाही. नागरिकांनी हत्तीला गावाच्या बाहेर हाकलुन दिले. हत्तीने गावात प्रवेश केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #wildelephat #gadchiroliforest #forest)