– शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) १ डिसेंबर : जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या जेप्रा येथील जोगेशवर गुंफलवार यांच्या शेतातील धानाचे पुंजने जळाल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी रात्रो १० वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जेप्रा येथील जोगेशवर गुंफलवार यांची शेतजमीन ठेकेदारीने मनोहर रघुनाथ गुंफलवार आणि वासुदेव मडावी यांनी केली होती. त्या शेतात धानाची शेती करण्यात आली होती, नुकतेच धान कापण्यात आले होते. ३० नोव्हेंबर रोजी रात्रोच्या सुमारास धानाच्या पुंजण्यास आग लागली यात संपूर्ण धान राख झाले. सदर घटनेने मात्र धान मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अज्ञात इसमाने धान पुंजण्यास आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाच्या वतीने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य नेताजी गावतूरे यांनी केली आहे. तर धानाचे पुंजने जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध लावून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहे.