The गडविश्व
गडचिरोली, २४ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने जिल्ह्यातील विविध विकासात्मक मागण्यांना घेऊन १४ ते २१ डिसेंबर २०२२ असा गडचिरोली ते नागपूर पर्यंत १७५ किलोमीटरचा भव्य पायी मोर्चा नागपूर विधान भवनावर नेण्यात येणार आहे. या संदर्भाने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुका अध्यक्ष, सेल अध्यक्ष तथा प्रमुख पदाधिकारी यांची बैठक गडचिरोली येथे संपन्न झाली.
बैठकीला प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ. नामदेव किरसान, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, मूलचेरा तालुका अध्यक्ष प्रमोद गोटेवार, भामरागड तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी सह काँग्रेस नेते संजय पंदीलवार, अनिल कोठारे, अब्दुल पंजवाणी, दिवाकर निसार, भैय्याजी मुद्दमवार, हरबाजी मोरे, सुभाष धाईत, दिलीप घोडाम, प्रभाकर कुबडे, एड. विजय चाटे, संजय चन्ने, भूपेश कोलते, धीवरु मेश्राम, घनश्याम मुरवतकर, जितेंद्र मुनघाटे, चारुदत्त पोहणे, बाळू मडावी, माजिद सय्यद, कृष्णाजी झंजाड, सुनील कुंबरे, मदन टापरे, अनिल भांडेकर, विकास देशमुख, राजू मेश्राम विनोद मंटकवार, विश्वेश्वर राव दरो, रुपेश नांदेकर,लालाजी सातपुते, राजेश ठाकरे, काशिनाथ सातपुते, अविनाश पिपरे, दीपक घुमडे, प्रतीक बार्शिंगे, महादेव भोयर, रोशन कोहळे, मयूर गावतुरे सह अन्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
#The Gadvishva #Mahendra Bhramhanwade #Gadchiroli Jilha Congres Cumity