– तीन बैलगाडीसह ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : जिल्ह्यात दारूबंदी असतांना अवैधरित्या दारूची तस्करी करणारे काय शक्कल लढवतील सांगता येत नाही. दारू तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता चक्क बैलगाडीतुन दारूची तस्करी करीत होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून बैलगाडीतून होणाऱ्या अवैध दारू तस्करीवर कारवाई करत बैलगाडीसह ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर कारवाई २७ फेब्रुवारी रोजी सिरोंचा तालुक्यातील टेकडा (ताला) गावालगत असणाऱ्या नदी परीसरात केली. या प्रकरणी उप पोलीस स्टेशन बामणी येथे संदिप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापु मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम सर्व रा. टेकडा (ताला) या चार आरोपींना अटक करुन गुन्हा नोंद करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सिरोंचा तालुक्यातील टेकडा (ताला) येथील दारु तस्कर संदिप दुर्गम हा मोठया प्रमाणात तेलंगाणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारुची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातुन वाहतुक करणार आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक गडचिरोली येथुन रवाना करण्यात आले व मौजा टेकडा गावालगत असणाऱ्या नदी परीसरात सापळा रचुन त्याच्या दिशेने येणाऱ्या तीन बैलगाडी व पोलीसांचा कानोसा घेण्याकरीता वापरण्यात आलेल्या दुचाकीस ताब्यात घेऊन पाहणी केली असता, सदर तीन्ही बैलगाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बिअर व व्हिस्की असा विदेशी दारुचा मोठा साठा आढळून आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत पोलीस पथकाने ५० बॉक्समधील २ लाख ५२ हजार रुपये किमतीचा विदेशी दारु साठा जप्त केला तसेच दारु तस्करीकरीता वापरण्यात आलेल्या 3 बैलगाडी व ईतर १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा असा एकुण ४ लाख २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, चापोना/दिपक लोणारे यांनी केलेली आहे. या कारवाईने अवैधरित्या दारू तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews #12exam )
Home Breaking News गडचिरोली : चक्क बैलगाडीतून करत होते दारू तस्करी, स्थानिक गुन्हे शाखेने चौघांच्या...