The गडविश्व
गडचिरोली, ३१ डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चवदार तळे आंदोलनातील निकटचे सहकारी सुरबाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस यांचे व्याख्यान ३ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता सम्यक बुद्ध विहार, गोकुळनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
‘क्रांती चवदार तळ्याची’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असून टिपणीस यांचा गडचिरोली शहरातील पहिलाच दौरा असल्याने गडचिरोली वासीयांकडून त्यांचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे.
दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपुर येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीराम बनसोड व आर.डी.स्थुल उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा, सम्यक समाज समिती, सम्यक ज्येष्ठ नागरिक संघ आणि विशाखा महिला मंडळाने केले आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates)