– पुण्यात खासदार नेते संसद आदर्श पुरस्काराने सन्मानीत
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांना नुकतेच पुणे येथे ‘आदर्श खासदार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या सन्मानानिमित्त गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांची आज ३१ जानेवारी रोजी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले व पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पुणे येथील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स आयोजित दोन दिवसीय युवा संसदेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यात ‘आदर्श खासदार’ म्हणून खासदार अशोक नेते यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली-लोकसभा क्षेत्राचे खासदर अशोक नेते मागील दोन टर्म पासून नेतृत्व करीत आहे. विपरीत परिस्थितीतही प्रतिनिधित्व करतांना त्यांच्या विकासकामे बघता ‘आदर्श खासदार’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
गडचिरोली ऑल मीडियाच्या वतीने खासदार अशोक नेते यांचा सत्कार करतांना गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनचे संयोजक हेमंत डोर्लीकर (पूर्णसत्य), संयोजक संदिप कांबळे (लोकशाही न्यूज), जयंत निमगडे (गडचिरोली वार्ता), अनिल बोदलकर (एविबी न्युज), उदय धकाते (महाभारत न्युज), किशोर खेवले (लोकप्रवाह न्युज), व्यंकटेश दुड्डमवार (गोंडवाना टाइम्स), बाळू म्हशाखेत्री (विदर्भ क्रांती), जगदीश कन्नाके (महाराष्ट्र टुडे न्युज) सचिन जिवतोडे (द गडविश्व), नारायण सोनूले (राईट टाइम न्युज) उपस्थित होते.
( the gadvishva, gadchiroli news, the gadvishva, gama, gadchiroli all midia asositation, MP Ashok Nete, #thegdv)