– विविध गुन्ह्यात होता सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : विविध गुन्ह्यात सहभाग असलेल्या नक्षली दांपत्याने गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.
वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु, दलम कमांडर (भामरागड दलम), (वय २८) रा. पिडमिली ता. चिंतागुफा, जि. सुकमा (छ.ग.) व त्याची पत्नी रोशनी विज्या वाचामी, दलम सदस्य (भामरागड दलम), (वय २४) रा. मल्लमपोड्डुर, ता. भामरागड, जि. गडचिरोली असे आत्मसमर्पित नक्षली दांपत्याचे नाव आहे.
शासनाने २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत 674 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु हा २०१५ मध्ये कोंटा एरीया मध्ये भरती होऊन सदस्य पदावर कार्यरत होता. २०१५ ते २०२० पर्यंत डीकेएसझेडसी गिरीधर तुमरेटी याचा अंगरक्षक म्हणून कार्यरत. नोव्हेंबर २०२० ते २०२२ पर्यंत भामरागड दलम मध्ये बदली होऊन उपकमांडर पदावर कार्यरत. २०२२ ते आजपावेतो भामरागड दलममध्ये दलम कमांडर पदावर कार्यरत. त्याचेवर आजपर्यंत एकुण १५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १० चकमक व ०५ इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
रोशनी विज्या वाचामी ही २०२५ मध्ये राही दलममध्ये भरती होऊन सदस्य पदावर कार्यरत, २०१६ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन २०१७ पर्यंत कार्यरत. १०१७ मध्ये अहेरी दलममध्ये बदली होऊन २०१९ पर्यंत कार्यरत. २०१९ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन २०२१ पर्यंत कार्यरत. २०२१ मध्ये गट्टा दलममध्ये बदली होऊन २०२२ पर्यंत कार्यरत. २०२२ मध्ये परत भामरागड दलममध्ये बदली होऊन आजपावेतो पार्टी मेंबर पदावर कार्यरत. तिचेवर आजपर्यंत २३ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १३ चकमक, इतर १० गुन्ह्रांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु याचेवर ०८ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. महाराष्ट्र शासनाने रोशनी विज्या वाचामी हिचेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु याला एकुण ५.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रोशनी विज्या वाचामी हिला एकुण ४.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले माओवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून १.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. असे एकुण ११.५ लाख रुपयांचे बक्षिस शासनाकडुन जाहिर करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत २७ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #spoffice #gadchirolilocalnews )