– जिल्हयात नक्षल्यांची धुडगुस सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. 22 : जिल्हयात नक्षल्यांचा धुडगुस सुरू असुन दोन दिवसांपुर्वी वाहनांची जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली होती. आता नक्षल्यांनी झाडे तोडून रस्ता अडविल्याची व पोस्टर लावल्याची बाब पुढे आली आहे. यापूर्वीच २२ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक नक्षल्यांनी पत्रकातुन देली होती आणि आता नक्षल्यांनी गुरूवारी रात्रोच्या सुमारास भामरागड तालुक्यात झाड रस्त्यावर तोडून पोस्टर लावुन जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
नक्षल्यांनी जिल्हयात धुमाकुळ माजवून डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात पीएलजीए सप्ताह दरम्यान पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातुन हत्या केली होती. तर २१ डिसेबंर रोजी मत्री धर्मरावबाबा आत्राम यांना तोडगट्टा आंदोलनावरून इशारा पत्रक जारी केले. गुरूवारी रात्रोच्या सुमारास नक्षल्यांनी भामरागड-आलापल्ली रस्त्यावरील बेजुर फाटयालगत झाड तोडून रस्त्यावर टाकले तर भामरागड लाहेरी रोडवर पोस्टर लावल्याचा प्रकार समोर आला आहे. झाड रस्त्यावर तोडून टाकल्याने भामरागड आलापल्ली रस्ता काही काळ बंद हेाता. पोलीसांनी झाड हटवून रस्त वाहतुकीसाठी मोकळा केला. जिल्यात नक्षली पुन्हा सक्रीय झाल्याने दहशत निर्माण झाली आहे तर नक्षल्यांच्या भारत बंदच्या आवाहनानंतर पोलीस सतर्क झाले होते.