गडचिरोली : आत्राम यांच्या खुनामध्ये सहभाग असलेल्या कट्टर नक्षलीस अटक

1708

– २ लाख रुपयांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : अनेक हिंसक कार्यवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या व कापेवंचा ता. अहेरी येथील निरपराध रामजी आत्राम यांच्या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या कट्टर जनमिलिशिया प्रमोद मधुकर कोडापे (वय ३७), रा. भंगारामपेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली यास गडचिरोली पोलिसांनी काल २० ऑगस्ट रोजी अटक केली. त्याच्यावर ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.
काल २० ऑगस्ट रोजी उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील भंगारामपेठा जंगल परिसरामध्ये उप-पोस्टे दामरंचा पोलीस पथक व सीआरपीएफ जी-9 बटा. चे जवान माओवाद विरोधी अभियान राबवित असतांना त्यांना सदर जंगल परिसरामध्ये प्रमोद कोडापे हा संशयितरित्या फिरत असतांना आढळुन आल्याने पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यांनंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मागील २४ नोव्हेंबर २०२३ रोजी कापेवंचा येथील रामजी आत्राम रा. कापेवंचा ता. अहेरी जि. गडचिरोली याचा माओवादयांकडुन खुन करण्यात आला होता. त्यावरुन उप-पोस्टे राजाराम खां. येथे दाखल कलम 302, 120(ब), 147, 148, 149, भादवि, सह कलम 3/27 भाहका मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास प्रभारी अधिकारी उप-पोस्टे राजाराम खां. यांच्या ताब्यात देऊन सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण 89 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रमोद मधुकर कोडापे याच्या अटकेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांण्डट जी-09 बटा. सिआरपीएफ शंभु कुमार,. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दासुरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी- 09 बटा. सिआरपीएफ अविनाश सोनी, प्रभारी अधिकारी उप-पोस्टे दामरंचा पोउपनि गणेश शिंदे, प्रभारी अधिकारी राजाराम खां. पोउपनि सचिन चौधरी व अंमलदार तसेच सिआरपीएफच्या जवानांनी पार पाडली. तसेच मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #naxalarrest )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here