– परिसरात दहशतीचे वातावरण
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा डोके वर करत एका निष्पाप इसमाची गळा दाबून हत्या केल्याची घटना दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कियेर येथे आज पहाटेच्या सुमारास घडली. सुखराम मडावी, (वय ४५) असे मृतकाचे नाव आहे.
नक्षल्यांनी सुखराम याची हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळ पत्रक टाकले आहे. पत्रकामध्ये नक्षल्यांनी सुखराम हा पोलिसांचा खबरी होता, परिसरातील पेनगुंडासारखे नवीन पोलीस मदत केंद्र उघडण्यास त्याने पोलिसांना मदत केली होती आणि पोलिसांना माहिती पुरवत होता असा आरोप केला आहे.
दरम्यान या वर्षातील नक्षल्यांकडू करण्यात आलेली ही पहिलीच सामान्य नागरिकाची हत्या आहे. गडचिरोली पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalarrest #murder #crimenews)