गडचिरोली : नक्षल्यांचा तांडव, रस्ता कामावरील वाहनांची केली जाळपोळ

4326

– घटनास्थळी पत्रकही आढळले
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : जिल्हयात नक्षंल्यांनी तांडव माजवला असुन जिल्हयातील अतिदुर्गम भागातील भामराड तालुक्यातील रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना आज २० डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मागील काही दिवसांपासून हिदुर-दोबुर-पोयरकोटी या रस्त्याचे बांधकाम सुरू होते. दरम्यान या रस्ता कामावरील वाहने नेहमीप्रमाणे हिदुर गावात ठेवली असता काल १९ डिसेंबर रोजी रात्रो नक्षली त्या ठिकाणी पोहचले व वाहनांची जाळपोळ केली. यात तीन ट्रक्टर आणि एक जेसीबीचा समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हयात नक्षल्यांचे तांडव सुरूच असुन भामरागड तालुक्यात रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्याने संबंधित कत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रकेही टाकली असुन २२ डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here