गडचिरोली : आता निवृत्त शिक्षक शिकविणार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये

2317

– पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये होणार कंत्राटी भरती
The गडविश्व
गडचिरोली दि. २४ : जिल्हयातील पेसा क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी निवृत्त शिक्षकांकडून ३१ जुलैपर्यंत अर्ज मागवुन घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
जुलै महिन्यात शाळा नियमित सुरु झाल्या मात्र जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता तसेच नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याने पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण
संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवा निवृत शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकीय पदे भरण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे.
त्यानुसार निवृत्ती वेतन घेत असलेल्या अथवा संबंधित तालुक्यात कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक / पदविधर शिक्षक / उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे कंत्राटी तत्वावर अध्यापन करण्यास इच्छूक असल्यास त्यांचेकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांमधून पदे उपलब्ध न झाल्यास अहर्ताप्राप्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांमधून हे पदे भरण्यात येतील. अर्जाचा नमुना जिल्हा परिषदेच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व सर्व पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी कळविले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #ceoayushising )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here