गडचिरोली : उद्या डिजिटल मीडियावर कार्यशाळेचे आयोजन

163

The गडविश्व
गडचिरोली, २० जानेवारी : डिजिटल मीडियामध्ये कार्य करतांना पत्रकारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेता डिजिटल मीडियात कार्यरत पत्रकारांकरिता तसेच डिजिटल मीडियामध्ये येऊ पाहत असलेल्यांकरिता बळीराजा पॅलेस, संविधान सभागृह चामोर्शी रोड गडचिरोली येथे उद्या शनिवार २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता न्यूज पोर्टल आणि डिजिटल मीडियासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत उपस्थितांना डिजिटल मीडिया तज्ज्ञ व पत्रकार देवनाथ गंडाटे मार्गदर्शन करणार असून या कार्यशाळेत डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचे महत्त्व, ऑनलाइन जाहिरात कमाईच्या टिप्स, Google AdSense कसे स्थापित करावे, न्यूज पोर्टल आणि त्यांच्याशी संबंधित कायदे, आदी विषयावर मार्गदर्शन होणार आहेत. या शिवाय संवाद चर्चा होईल.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Usain Bolt) (Trossard) (That ’90s Show) (Hockey World Cup 2023) (Man City vs Tottenham)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here