– तीन दिवसांची पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : पत्नीशी घटस्फोट झाल्याचे सांगुन तरूणीला प्रेमाच्या जाळयात अडकवून लैगिक शोषण करत त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देत ब्लकमेलींग करत दागिने व सव्वा तीन लाखांची मागणी पोलीस शिपायाने केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पद्याकर भगवान भोजने (वय ३८) असे त्या पोलीस शिपयाचे नाव आहे. याप्रकरणी त्याला पोलीसांनी अटक केली असुन तिन दिवसांची पोलीस कोठडी न्यायलयाने सुनावली आहे.
पद्याकर भोजन हा पोलीस मुख्यालयात कार्यरत होता अशी माहिती आहे. दरम्यान तो विवाहित असतांनाही पीडीत तरूणीशी त्याने आपला घटस्फोट झाल्याचे सांगुन प्रेमसंबंध जुळविले. त्यानंतर तो तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान पिडीत युवतीने लग्नासाठी विचारले असता त्याने नकार दिला व त्यानंतर त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लकमेलिंग सुरू केली व दिड लाखांचे दागिने व सव्वा तिन लाखांची मागणी पिडीतेकडे करू लागला. त्यामळे त्रस्त झालेल्या पिडीत तरूणीने गडचिरोली पोलीस स्टेशन गाठुन तक्रार नोदविली. पिडीतीच्या तक्रारीवरून बलात्कार व ॲट्रासिटीनुसार पद्याकर भोजने विरूध्द गुन्हा दाखल करून २३ जून रोजी अटक करण्यात आली. त्यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे. सदर घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
(thegdv, thegadvishva, gadchirolinews, modi avas yojna, kurkheda, gadchiroli local news, Brazil vs Costa Rica, Croatia vs Italy,Albania vs Spain, Axar Patel,Gautam Adani, AFG बनाम BAN, OnePlus Nord CE 4 Lite, भारत बनाम ऑस्ट्रेलिया, Messi, PM Modi, SSC CGL )