गडचिरोली : पोलीस – नक्षल चकमक उडाली, पोलीस अधिकारी जखमी

5165

– गृहमंत्री फडणवीस जिल्ह्यात असतानाच उडाली चकमक
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात आज १७ जुलै रोजी दुपारी ०१.३० ते ०२.०० वाजताच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचाराकरिता गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात सी – ६० चे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असताना पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एका पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे तर काही नक्षली ठार झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. दरम्यान आज १७ जुलै रोजी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सूरजागड इस्पात प्रा. लि. च्या भूमिपूजन कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. गृहमंत्री जिल्हा दौऱ्यावर असतानाचा चकमक उडाली असून या चकमकीत काही नक्षली ठार झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. अधिक माहिती पोलीस दल परत आल्यावर कळणार असून परिसरात शोधमोहीम तीव्र केल्याची माहिती गडचिरोली पोलिस दलाकडून प्राप्त झाली आहे.©©©

(#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolilocalnews #polis naxal firing )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here