गडचिरोली : पोलीस-नक्षल चकमक, मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त

3124

– भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश
The गडविश्व
गडचिरोली, १६ जानेवारी : उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे पेरमिली हद्दीतील वेडमपल्ली जंगल परिसरात १५ जानेवारी रोजी पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव बघता नक्षल्यांनी जंगलात पळ काढला दरम्यान घटनास्थळी शोधमोहीम राबविली असता घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.
गडचिरोली पोलीस दलाचे विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना रविवार १५ जानेवारी रोजी दुपारी २.०० वा. दरम्यान वेडमपल्ली जंगल परिसरात २० ते २५ अशा मोठ्या संख्येत असलेले नक्षली पोलीस जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. विशेष अभियान पथकांच्या बहादूर जवानांनी प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. दरम्यान जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताची नक्षल्यांची कुटील योजना गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांनी हाणून पाडली.
नक्षल चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, त्यामध्ये ०१ नग भरमार, ०१ नग पिस्टल, ०१ नग वॉकीटॉकी चार्जर व इतर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. यांचे देखरेखीखाली पार पडली.
विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कौतूक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Naxal) (Police Naxal Firing) (PSG) (Australian Open) (The Last of Us TV series) ( Khashaba Dadasaheb Jadhav) (Chhatrapati Sambhaji Maharaj) ( Russia • Yakutsk • Siberia • Cold wave) ( Pongal • Mattu Pongal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here